Home क्राईम तलवार हल्ल्यातील फरार आरोपी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात

तलवार हल्ल्यातील फरार आरोपी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात


jail

भुसावळ प्रतिनिधी । मागील भांडणाचे कारण काढून तलवारीने हल्ला करून फरार असलेल्या दोघा संशयित आरोपींनी आज रविवार भुसावळ पोलीसांनी सापळा रचुन अटक केली आहे. हल्ला प्रकरणी भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास सपकाळे रा. भुसावळ याला 25 एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास मागील भांडणाचे कारणावरून फरार आरोपी भावेश दंडगव्हाळ आणि अमोल चौधरी यांनी तलवार काढून मारहाण केल्याची घटना घडली होती. याबाबत भुसावळ शहर पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. 25 मे रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील यावल नाकाजवळ असल्याची गुप्त माहिती भुसावळ शहर पोलीसांना मिळाल्याने त्यांनी यावल नाक्याजवळ सापळा रचून मोठ्या शिताफिने अटक केली.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक बी.बी.ठोंबे, पोउनि नाना सुर्यवंशी, हेकॉ सय्यद, शंकर पाटील, साहिल तडवी, सुनील सैंदाणे, पो.कॉ. संजय बडगुजर, मोहन पाटील, समाधान पाटील यांनी कारवाई केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound