राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच ‘या’ दिवशी पगार मिळणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. ऑक्टोबर महिन्याचे वेतन २१ ऑक्टोबर पुर्वी देण्याचे निर्देश शिंदे सरकारने दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापुर्वीच सर्वांना वेतन देण्यात येत आहे.

यंदा दिवाळी ही रविवार २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरा करतांना कोणतीही अडचण निर्माण होवू नये याचा विचार करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिला मिळाला आहे. २१ ऑक्टोबर पुर्वीच कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावे असे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालयं आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे.

राज्य शासनातील सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.

 

Protected Content