संपकाळात निलंबीत वाहक महीला कर्मचारी पुनश्च कामावर हजर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील यावल आगारात वाहक म्हणुन कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांना महाविकास आघाडी शासन काळात एसटी महामंडळाच्या विरोधातील मागील काळात चाललेल्या संपात अग्रभागी सहभाग घेतल्याबद्द व तत्कालीन आघाडी शासनाकडुन निलंबीत झालेल्या महीला कर्मचारी यांचे शिंदे शासनाने निलंबन मागे घेतल्याने त्या पुनश्च कामावर रुजु झाल्या आहेत.

 

यावल एसटी आगारातील सोनी बैरागी ह्या महीला वाहक कर्मचारी यांनी संपुर्ण राज्यात एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना संदर्भात पुकारण्यात आलेल्या व दिर्घ काळ चाललेल्या आंदोलनात अग्रभागी  राहुन आपला सक्रीय सहभाग नोंदविला होता. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात सत्ता परिवर्तन होवुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शासनाने तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने संपकाळात राज्यातील ११८ एसटी कर्मचारी यांना सेवेतुन निलंबीत केले होते. या सर्व एसटी कर्मचाऱ्यांवरील  निलंबन मागे घेण्यात आले आहे. यात यावल आगारातील निलंबीत झालेल्या वाहक सोनी बैरागी यांचे ही निलंबन मागे घेण्यात आले. त्या आजपासुन पुनश्च कामावर रुजु झाल्या आहेत. यावल तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.  निलेश गडे, पक्षाचे जेष्ठ पदधिकारी किशोर कुलकर्णी, युवा मोर्चाचे परेश नाईक, रितेष बारी आदी पदाधिकारी यांनी यावल आगारात मिठाई वाटुन आनंद व्यक्त केला. सोनी बैरागी यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत सत्कार केले. या प्रसंगी मोठया संख्येत एसटी आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content