मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपने माघार घेतल्याने ऋतुजा लटके यांचा मार्ग सुकर झाला आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केला होता. कालपासूनच या निवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी असे आवाहन शरद पवार आणि राज ठाकरे यांनी केले. यानंतर आज भाजपने आपला उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, भाजपने उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली असली तरी मुरजी पटेल हे नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे ते अपक्ष उमेदवारी राहू देण्याची शक्यता देखील आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत असल्याने यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.