अमळनेर (प्रतिनिधी) जळगांव जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदानावर नियुक्त डीसीपीएस (अंशदायी पेंशन) योजनाधारक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सभा उदया (दि.२७) मे रोजी दुपारी २.०० वाजता जळगाव येथे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीत याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तरी संबंधित जिल्ह्यातील संबंधित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी यासभेला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील, सेक्रेटरी जी.आर. चौधरी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एच.जी. इंगळे, सेक्रेटरी एस.डी. भिरूड यांनी केले आहे.