Home क्राईम लोखंडी सळईंची चोरी करणाऱ्याला अटक

लोखंडी सळईंची चोरी करणाऱ्याला अटक

0
49


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडी रोडवरील नूतन वर्ष कॉलनीतून बांधकामासाठी लागणारे लोखंडी आसारी चोरून नेल्याचे प्रकार समोर आला आहे. या संदर्भात १० ऑक्टोबर रेाजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून संशयित तरूणाला अटक करण्यात आली आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मुरलीधर महाजन (वय-५२) रा. मोहाडी रोड, नूतन वर्षा कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. त्यांचे मालकीचे त्यांच्या घराच्या बाजूला बांधकामासाठी लागणारे लोखंडी आसाऱ्यांचे पिंजरे तयार करून ठेवण्यात आले होते. दरम्यान सोमवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास समता नगरातील शेख शरीफ शेख सलीम (वय-२३) या तरुणाने ५ हजार रुपये किमतीचे २५ किलो लोखंडी आसारींचे पिंजरे चोरून नेल्याचे समोर आले. दरम्यान प्रशांत महाजन यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १० वाजता संशयित आरोपी शेख शरीफ शेख सलीम (वय-२३) रा. समता नगर, जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound