Home क्राईम गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
49


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील नॅचरल ड्रायफूट दुकानासमोरून तरूणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुप्रीम कॉलनीत राहणारा अंकश दल्लू राठोड (वय-२७) हा तरूण सोमवार ३ ऑक्टोबर रोजी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच २० एफके २३२०) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आलेला होता. त्यावेळी त्याने त्यांची दुचाकी ही नॅचरल ड्रायफूट दुकानासमोर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे रात्री १० वाजता उघडकीला आले. अंकुशने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.


Protected Content

Play sound