Home क्राईम अकोल्यात राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

अकोल्यात राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या


kisscc0 bloodstain pattern analysis heart blood 5b3e0cb727fa06.4014185215307931431638

अकोला (वृत्तसंस्था) अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. मतीन पटेल असे हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.

मोहाळा हे गाव अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे गाव आहे. त्यांच्याच गटाचा भाजप कार्यकर्त्यांशी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मोहाळा गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे सर्व दहा आरोपी हत्याकांडानंतर फरार आहेत. दरम्यान या घटनेत मुमताज पटेल नामक आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound