बुलढाणा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व टेनिस व्हॉलीबॉल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वा राज्य टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा येथे दि. २५ सप्टेंबर रोजी समारोप झाला,
परभणी जिल्हास सबज्युनिअर मुले/मुली व मिश्र दुहेरीत व ज्युनिअर मुलांच्या गटात, तर बीड जिल्हा ज्युनिअर तर मुंबई शहर ने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक प्राप्त केले.
अंतिम फेरीत ज्युनिअर मुलीच्या गटात बीड वि. परभणी चुरशीच्या लढतीत ३-२ सेट पराभव करत सुवर्ण-बीड, परभणी रौप्य, यवतमाळ- कांस्यपदक, अंतिम फेरीत ज्युनिअर मुलीच्या गटात परभणी वि. बीड चुरशीच्या लढतीत ३२ सेट पराभव करत होते. परभणी- सुवर्ण, बीड- रोप्य, यवतमाळ- कांस्यपदक, अंतिम फेरीत ज्युनिअर मुलीच्या गटात बीड वि. परभणी चुरशीच्या लढतीत ३-२ सेंट पराभव करत सुवर्ण बीड, परभणी – रौप्य कांस्यपदक, अंतिम फेरीत सबज्युनिअर मुलीच्या गटात परभणी वि. बीड चुरशीच्या लढतीत २-१ सेट पराभव करत सुवर्ण परभणी बीड- रोप्य यवतमाळ कांस्यपदक, अंतिम फेरीत सबज्युनिअर मुलाच्या गटात परभणी वि. बीड चुरशीच्या लढतीत २१ सेट पराभव करत सुवर्ग- परभणी बीड- रौप्य, यवतमाळ कांस्यपदक, अंतिम फेरीत सबज्युनिअर मुलीच्या गटात परभणी वि. बीड चुरशीच्या लढतीत ३-२ सेट पराभव करत सुवर्ण परभणी बीड- रौप्य, यवतमाळ कांस्यपदक मिळाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शंतनु बोंद्रे, प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश पाटील, आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. व्यंकटेश बांगवाड, महाराष्ट्र राज्य सचिव गणेश माळवे, सहसचिव किशोर चौधरी, राज्य कोषाध्यक्ष दिनेश सिंगाराम, विभागीय सचिव जयदिप सोनखासकर, राज्य मुली सदस्य संजय ठाकरे, तांत्रिक समिती चेअरमन प्रफुल्लकुमार बन्सोड यांची उपस्थिती होती. या स्पर्धेतून तामिळनाडू येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड समिती सदस्य अशोक शिंदे (मुंबई) रामेश्वर कोरडे (औरंगाबाद) संतोष खंडे (सोलापूर), प्रमोद महाजन (औरंगाबाद) प्राची कडणे (आंतरराष्ट्रीय खेळाडू) यांची उपस्थिती
स्पर्धेसाठी पंच म्हणून सतीश नावाडे, गणेश पाटील, राजेंद्र राहुल पेटकर, संतोष शिंदे, गणेश जमदाडे, अभिषेक सोनवणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रवींद्र महाडिक तर आयोजन समितीचे सचिव देवानंद नेमाने यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी माधव मंडळकर (कोषाध्यक्ष), अमोत उरसाल (उपाध्यक्ष), प्रभाकर जाधव, दिलीप साडकर, सुनील पवार, दिलीप बंगड, पुरुषोत्तम निळे, राम कावाल, फईम सौदागर, अस्लम हिरीवाले, गणेश पेरे, पुरुषोत्तम कापसे, सुनील ढंग, दिपक महाले, संदिप नेमाने, संजय गायकवाड, मंगेश कांडेकर, भागवत शेळके, भागवत, मुरुमे, पांडुरंग कोईगडे, ज्ञानेश्वर जाधव, अमोल नेमाने आदीने परीश्रम घेतले.