Home Cities अमळनेर टाकरखेडा येथे भरदिवसा घरफोडी ; ऐंशी हजाराची चोरी

टाकरखेडा येथे भरदिवसा घरफोडी ; ऐंशी हजाराची चोरी

0
38

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथे भरदिवसा घरातून ऐंशी हजाराची चोरी झाल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील विजय पाटील हे आपल्या आई व पत्नीसह सकाळी शेतात कामासाठी गेले होते. त्यात दुपारीच्या 12 ते 2 वाजेदरम्यान दरवाजा तोडून घरातील सोन्याचे ७ ग्रॅमचे टोंगल, ८ ग्रॅमचे काप असे १५ ग्रॅम सोने व 1500 (पंधरासे) रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. कुटुंबातील सर्वच सदस्य शेतात कामावर गेल्याची संधी साधीत चोरट्यानी चोरी केल्याची घटना ही ते घरी दुपारी अडीच वाजता घरी आल्यावर सारा प्रकार लक्षात आला.


Protected Content

Play sound