



जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केट परिसरातून तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना दि. २५ रोजी दुपारी १२.४५ वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील आनंदमंगल सोसायटीमधील गणेश राजेंद्र ठाकूर हे वास्तव्यास आहे. दि. २५ रोजी दुपारी १२.४५ वाजता गोलाणी मार्केटमध्ये आले होते. त्यांनी आपली (एमएच १९ डीए ६४०६) क्रमांकाची दुचाकी अमर सेंटरजवळील मायटी ब्रदर्ससमोर पार्कींग करुन लावली होती. त्यानंतर ते कामासाठी निघून गेले. काम आटोपून ते दुचाकी लावलेल्या ठिकाणी परतले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी संपुर्ण परिसरात शोध घेवून देखील त्यांना मिळून आली नाही. दरम्यान, सोमवारी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना योगेश पाटील करीत आहे.



