भुसावळ प्रतिनिधी । ९० हजार रूपयांची चोरी करणार्या आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत वृत्त असे की, ९० हजार रूपयांची चोरी केल्या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्थानकात भाग २८७/२०१९ भादंवि कलम-४५७,३८० प्रमाणे दिनांक २०.०५.२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळलेल्या महिती वरून संशयित आरोपी कुणाल वामन इंगळे वय-२४ रा.पंचशील नगर भुसावळ यास शहरातील आठवडे बाजार भागातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात सादर केले असता न्यायाधिशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधीत कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शन खाली पोहेका सुनील जोशी, विजय पाटील, पोना किशोर महाजन, पोकॉ विकास सातदिवे, समाधान पाटील यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पो हे का मिलिंद कंक करीत आहेत.