जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतील भाग्योदय हाऊसिंग सोसायटीतून खासगी नोकरदाराची १५ हजार रूपये किंमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २४ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र गजानन मांढरे (वय-४१) रा. भाग्योदय हौसिंग सोसायटी, गणेश कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ एआर १३३२) ही घरसमोर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे २४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. रविंद्र मांढरे यांनी परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे करीत आहे.