जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वच्छता हाच शाळेचा खराखुरा दागिना आहे असे प्रतिपादन जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार यांनी नुकतेच जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलतांना सागितले.
पुढे बोलतांना सांगितले की, आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी अन्न, पाणी, कपडे आणी घराच्या स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. निपुण भारत मिशन अंतर्गत बाला उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा सभा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी शालेय पोषण आहाराचे तालुका अधिक्षक व्ही. व्ही. काळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना विषयी तसेच सकस आहाराचे महत्त्व पटवून सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचा वाढदिवसानिमित्त बुके व शाल देवून सत्कार करण्यात आला. पी.टी.पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिरा हा पदार्थ वाटप करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी इयत्ता दुसरी ते सातवीच्या वर्गांना भेटी देवून निपुण चाचणी संदर्भात तसेच विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. यावेळी त्यांनी किचनशेड तसेच शापोआ धान्यसाठा खोलीची प्रत्यक्ष पाहणी केली व स्वयंपाकी व मदतनीस यांना शापोआ मेनू तसेच आहार विषयी माहिती विचारली. उपस्थित मान्यवरांनी शालेय पोषण आहार योजना तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शाळेचा स्वच्छ व सुंदर परिसर पाहून समाधान व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास वराडे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ. रुपाली आगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील,पालक निवृत्ती आगळे, शापोआ डाटा आॉपरेटर गजानन पाटील शाळेतील शिक्षक जयश्री पाटील, छाया पारधे, रामेश्वर आहेर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी व सुत्रसंचलन उपशिक्षक जयंत शेळके यांनी केले व आभार केंद्रप्रमुख विकास वराडे यांनी मानले.