यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडाजवळ असलेल्या शेळगाव बॅरेजच्या तापी नदीपात्रात डोहात काल बुडालेल्या तरुणाचा शोध घेत असताना अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला आहे. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील देशमुख वाडा परिसरातील लहान मारोती मंदीराजवळ राहणारा निलेश सुरेश निंबाळकर (वय १९ वर्ष ) हा दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मोटर सायकलने जळगाव येथे गेला होता. दिनांक २३ रोजी सायंकाळी ५ वाजता निलेश हा आपल्या मित्रासोबत जळगाव येथून शेळगाव मार्ग येत असतांना शेळगाव बॅरेजजवळ असलेल्या डोहाच्या पाण्यात तो पोहणास गेला. पोहतांना सुमारे पन्नास मिटर लांब पोहता पोहता नदीत आत गेल्यावर त्याचा स्वास फुलु लागल्याने त्यांने पोहणे थांबवून तो मला वाचवा असे ओरडू लागला.. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना पोहता येत नसल्याने त्यांनी दिसेल त्याला निलेशला वाचविण्याची प्रयत्न करू लागले. काही करण्याआधीच निलेश हा पाण्यात अदृष्य झाला. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जावुन परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्याकडुन निलेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार झाल्याने पोलीसानी आपले शोध कार्य थांबविले. आज दिनांक २३ रोजी सकाळी ११.३० वाजता निलेशच्या मृतदेहाचा शोध घेत असतांना निलेशचे प्रेत हे तब्बल १८ तासानंतर डोहाच्या पाईपाजवळ फुगुनवर आल्याचे दिसुन आले. याबाबत निलेश निंबाळकर याचे वडील सुरेश धोंडु निंबाळकर यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी यांनी शवविच्छेदन केल्यावर निलेशचे प्रेत त्यांच्या कुंटुबाकडे सोपविले. निलेशवर आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.