राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी : अमेठीत मात्र लाजीरवाणा पराभव

download 5

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य केला असला तरी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना राहुल यांनी ४ लाख २९ हजार १६१ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. अमेठीत त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी वायनाड मधून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय त्यांना फायद्याचा ठरला आहे.

 

राहुल यांना वायनाडमध्ये एकूण ७ लाख ४५५ मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सीपीआयचे पी.पी. सुनीर यांना २ लाख ७१ हजार २९४ मते मिळाली आहेत. अमेठीपाठोपाठ वायनाडमधून राहुल यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. केवळ मतांचं ध्रृवीकरण करण्यासाठीच राहुल वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. दरम्यान, अमेठीतून जिंकणं कठीण असल्याचा अंदाज राहुल यांना आधीच आला होता. त्यामुळेच त्यांनी इतर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Add Comment

Protected Content