सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील शेतात दोन तोंडी मांडूळ आढळून आल्यानं गावातील नागरिक संतोष भालेराव यांनी त्याला पकडून सावदा पोलीस स्टेशन येथे आणलं.
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना कळवलं त्यांनतर रावेर वनक्षेत्र विभागाचे वनरक्षक राजू बोंडले हे यांनी सावदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन मांडूळ ताब्यात घेतलं.
त्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास सुरक्षितत्या ठेवलं असून उद्या सकाळी ते त्या मांडूळास सुरक्षितरीत्या राखीव जंगलात सोडणार असल्याचं वनरक्षक यांनी सांगितलं.