यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल गेले.
तहसीलदार महेश पवार आणि पोलीस निरीक्षकांची परवानगी घेऊन ते वृत्तांकन करण्यासाठी गेल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने “खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे ? का जर दिली नसेल; तर तुम्हाला महाग पडेल.” अशी धमकी दिल्याने यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने याबाबतचे निवेदन फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, प्रांताधिकारी कैलास कडलक तसेच येथील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना दिले आहे.
तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतरही पोलिसांनी पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असून या संदर्भातील निवेदन देताना पत्रकार संघ शहराध्यक्ष सुरेश पाटील, अय्युब जी पटेल, डी, बी.पाटील, शेखर पटेल, भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष संघाचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, सुनिल गावडे, तेजस यावलकर, पराग सराफ, विकी वानखडे, दीपक नेवे, समाधान पाटील, ज्ञानेश्र्वर मराठे, वासूदेव सरोदे, योगेश सोनवणे, समीर तडवी, निलेश पाटील यांचेसह पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते.