Home धर्म-समाज ‘कॉमेडी किंग’ राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

‘कॉमेडी किंग’ राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

0
139


नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉमेडीचा बेताज बादशहा म्हणून ख्यात असणारे अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे दीर्घ उपचारानंतर आज निधन झाले आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे.वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुरू होते. त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पार्थिवावर उद्या किंवा परवा अत्यंसस्कार करण्यात येणार आहे.

राजू श्रीवास्तव ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरुन अधिक काळापासून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती.

 


Protected Content

Play sound