रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात विविध ठिकाणी आकोडे टाकून विजचोरी करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रावेर शहरात जुना सावदा रोड,मदिना कॉलनी, स्टेशन रोड परिसरात आकोडे टाकून विजचोरी करणाऱ्यां ५० जणां विरुध्दात कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विस् हजारा दंड चोरी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात आल्याची माहिती आहे.
ही कारवाई महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता दिलीप सुनराणी, सहायक अभियंता समीर तडवी, वायरम संतोष जाधव, गणेश दहीभात, श्रीकृष्ण बोरकुल इत्यादी महावितण विज चोरी विरोधी पथकाने कारवाई केली असुन रावेर शहरात अजुन कारवाई होणार असल्याची माहीती आहे.