आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी श्रीदत्त मंदीर सभामंडपाच्या कामास मंजूरी

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी करमाडे येथील श्रीदत्त मंदीर सभामंडपासह विविध ८२ लक्ष रुपयांच्या विकास कामांमंजूरी प्राप्त झाली आहे.  यानिमित्ताने करमाडे ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे संचालक अमोल  पाटील यांचा नागरी सत्कार केला.

 

करमाड येथे श्रीराम मंदीर येथे सभामंडप बांधणेसाठी – २५ लक्ष, करमांडा तांडा येथे सभामंडप बांधणेसाठी – १० लक्ष, गावांतर्गत भारत नवल पाटील यांच्या घरापासुन ते सुकदेव दत्तु पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी – ५ लक्ष, गावांतर्गत पुंडलिक गोविंदा पाटील यांच्या घरापासुन ते भटु पोपट सोनार व सुकदेव दत्तु पाटील यांचे घरापासुन ते मेन रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी – १० लक्ष, गावांतर्गत बंदीस्त गटार बांधणेसाठी – ४, गावांतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लाॕक बसविणेसाठी ३ लक्ष, असे एकुण ८२ लक्ष रूपयांचा कामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे  करमाड खु गावाच्या वतीने पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा करण्यात आला.

याप्रसंगी अमोल पाटील यांनी  गावाचा सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबद्द असुन मंजुरी मिळालेल्या कामांपेक्षाही उर्वरीत विकासकामांसाठी आ. चिमणराव पाटील यांच्या माध्यमाने अधिक पटीने निधी आणणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुलाबराव पवार, हेमंत पाटील, गोपाल पाटील, सरपंच शरद पवार, त्र्यंबक पाटील, आर. एम. पाटील, आर. एच. पाटील,  विजय निकम, समाधान मगर यांच्यासह ग्रामपंचायत शिष्टमंडळ मंडळ, तरूण बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content