जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील गांधी मार्केटजवळील विजय कलेक्शन दुकानासमोरून महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार १४ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास गिरधर सपकाळे (वय-४०) रा. कांचन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कैलास हे महापालिकेत पाणीपुरवठा विभागात वालमन म्हणून नोकरीला आहे. २६ ऑगस्ट रेाजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास कैलास सपकाळे हे गांधी मार्केटजवळील विजय कलेक्शन दुकानाच्या समोर त्यांची दुचाकी (एमएच १९ बीए ८७४९) पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. अखेर बुधवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली
2 years ago
No Comments