जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सात महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील राहणारी १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नशिराबाद येथे असतांना अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत विशाल तान्हाजी पवार रा. धावडा ता. भोकरदन जि.जालना याने तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे करीत आहे.