पारोळा येथे तालुका भाजपतर्फे गुणवतांचा सत्कार

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी पारोळा तालुका वतीने माजी खासदार ए.टी. पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध गुणवंत व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

शहर व तालुक्यातील NEET परीक्षेत क्षितिज शहा, सुधीर पवार, नितेश चौधरी व तेजस चौधरी या विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादन केले. तसेच ऍड.स्मिता मोरे व शीतल मिसर हे एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पारोळा ते तिरुपती सायकलवारी करणारे घनश्याम ठाकरे तसेच किरण पुंजु वाणी लाडशाखीय वाणी समाज मंडळ पदी पुनर्नियुक्ती झाली.

या सर्वांचा माजी खासदार ए टी पाटील यांच्या निवासस्थानी व त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी नगरसेविका रेखाताई चौधरी माजी नगरसेविका हेमलता पाटील तसेच बालाजी संस्थान अध्यक्ष श्रीकांत शिंपी ट्रस्टी केशव क्षत्रीय, प्रकाश शिंपी, दिनेश गुजराथी, अनिल गुजराती, गोपाल दाणेज, भाजप तालुकाध्यक्ष अतुल मोरे, भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, डॉक्टर विलय शहा, नगरसेवक नरेंद्र राजपूत तसेच दत्तात्रय महाजन तालुका सरचिटणीस सचिन गुजराथी, समीर वैद्य, संकेत दाणेज, विजय मेटकर, नरेंद्र साळी, हर्षल पाटील, विनोद खाडे, बापू कुंभार, निलेश कुंभार, गजानन ठाकरे आदि उपस्थित होते.

 

Protected Content