Home Cities जामनेर पहूर येथे स्मशानभूमी परीसर व वाघूर नदी तीरावर वृक्षारोपण

पहूर येथे स्मशानभूमी परीसर व वाघूर नदी तीरावर वृक्षारोपण

0
66

 

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ग्रामपंचायत पहूर पेठतर्फे माझी वसुंधरा अभियान भाग तीन व आदर्श त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ पहूर यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील समशान भूमी परिसरात तसेच वाघुर नदी तीरावर 100 वृक्षारोपण करण्यात आले.

यामध्ये वड, पिंपळ, देशी प्रजातीचे आंबा, निंब ,आदी शंभर झाडे समशानभूमीवर वाघुर नदी तीरावर लावण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा सरपंच पदी रामेश्वर पाटील, आदर्श त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, शिवसेना शहर संघटक संजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेढे, भारत पाटील, विकास सोसायटीचे संचालक राजेश लोढा, एस.व्ही.पाटील, रामराव देशमुख, शांताराम गोंधनखेडे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound