Home राजकीय हिंदूंच्या नादाला लागाल तर खबरदार ! : नितेश राणे

हिंदूंच्या नादाला लागाल तर खबरदार ! : नितेश राणे

0
30


श्रीरामपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज शिर्डी येथे लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि आदिवासी तरूणींचे अपहरण अशा मुद्द्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये माजी आदिवासी विकास मंत्री अशोक विखे सुद्धा उपस्थित आहेत. श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, या मोर्चात आमदार नितेश राणे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आता मुश्रीफ, मलिक मंत्री नाहीत आणि उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री नाहीत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांत जास्त हिंदुवर आत्याचार झाले. ठाकरे सरकार हे हिंदुविरोधी सरकार होते पण आता भाजपचं सरकार आहे त्यामुळे आता असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. हिंदू मुलांच्या नादाला लागाल तर डोळे काढू. असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.


Protected Content

Play sound