धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात एकाच मध्यरात्री ३ घरे चोरट्यांनी फोडली तर एक किराणा दुकान फोडण्यात मात्र अपयशी झाल्याने चोरटे फरार झाले आहेत. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीसपथक घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरु आहे.
मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथील ३ घरातील परिवार बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी या घरावर 3 डल्ला मारत लाखो रुपयाचा ऐवज तर एक किराणा दुकान फोडण्याचा धाडसी प्रयत्न करण्यात आला आहे. या तीनही घराच्या चोरीत लाखो रुपये व सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याचीघटना दि ६ रोजीच्या मध्यरात्री घडल्याने आज दि. ७ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. हि घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत पंचनामा करण्याचे काम सुरु केले आहे.
दरम्यान, येथील रहिवासी बना धोंडू पाटील, दिलीप रघुनाथ पाटील, पंढरीनाथ अंबक पाटील यांच्या घरात ही चोरी झाली आहे.