Home धर्म-समाज स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे हरतालिकानिमित्त वृक्ष लागवड

स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे हरतालिकानिमित्त वृक्ष लागवड

0
32

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगावपासुन जवळच असलेल्या किनगाव ते डोणगाव रस्त्या दरम्यानच्या इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल व स्व. केतनदादा मल्टिपर्पज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व व्ही. मार्टचे संचालक मनिष पाटील यांच्या संकल्पनेतून हरितालीका या उपवासानिमीत्ताने मंगळवार दि.३० रोजी ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्गापासून ते इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलपर्यंत रस्त्याच्या दोंन्ही बाजुला पिंपळ, निंब व वड या जातींच्या अशा सुंदर ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी इयत्ता ८ वी ते इ.१० वीच्या विद्यार्थीनी विद्यार्थ्यानसह इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील, स्कुलच्या उपमुख्याध्यापीका राजश्री अहिरराव, सोनाली कासार, मिलिंद भालेराव, गोपाल जयवंत चित्ते, सुहास भालेराव, शाहरुख खान, प्रतीक एम. तायडे, अनिल बारेला, बाळासाहेब पाटील इ. शिक्षक आदी उपस्थित होते.

या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी स्कुलचे सचिव मनिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका राजश्री सुभाष अहिराराव यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound