जळगाव प्रतिनिधी । मुंबईतून बिहारकडे रेल्वेने निघालेल्या 45 वर्षीय व्यक्तीला जळगाव रेल्वे स्टेशनला आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रेल्वे पोलीसांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ही घटना सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान मंगळवारी रात्री 1 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजकिशोर सत्यम मंडळ (वय-45) रा. मडीया ता.रतनपूर जि. सितामणी (बिहार) हे गावाकडून कामाला मुंबईला खासगी कंपनीत कामला होते. दरम्यान 12546 कर्मभूमी एक्सप्रेसने आज सोमवारी सकाळी 11.30 वाजता बिहारकडे जाण्यासाठी बसले. त्यांच्यासोबत त्यांचे गावाकडील सहकारी देखील होते. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास रेल्वे जळगावला पोहचण्याआगोदर त्यांना हृयविकाराचा झटका आला. त्यांच्या मित्र सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने त्यांना जळगाव रेल्वे स्थानकावर उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले. त्यांना तेथे उपचार सुरू केले. दरम्यान मंगळवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह सहकारी मित्रांच्या ताब्यात देण्यात आले.