भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला बायोकेमिकल ऑईल देण्याचा बहाणा करून सुमारे १६ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत दोन जणांविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारंगधर महादेव पाटील (वय-५५) रा. गुंजाळ कॉलनी, जळगाव हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांची हिरेन तोमर आणि राकेश (पुर्ण नाव माहित नाही) यांची ओळख होती. बायोकेमीकल ऑईल देण्याच्या आमिष दाखवत १६ लाख रूपये घेतले. दरम्यान, आईल देण्यास टाळाटाळ केली. वारंवार फोन करून देखील पैसे किंवा आईल दिली नाही म्हणून सारंगधर पाटील यांनी भुसावळ बाजार पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून हिरेश तोमर आणि राकेश यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गोपाळ गव्हाळे करीत आहे.