Home क्राईम शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; सीसीटीव्हीत पुरावे (व्हिडीओ)

शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; सीसीटीव्हीत पुरावे (व्हिडीओ)

shanipeth chori
shanipeth chori

shanipeth chori

जळगाव प्रतिनिधी । शहरात मोबाईल चोरीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अवघ्या दोन चारशेर रूपयांकरीता अल्पवयीन मुले चोरी करतांना मागेपुढे काही पाहत नाही. अशीच एक घटना शहरातील भवानी मंदीराच्या मागे भाजी घेतांना चोरी करतांना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, नईम इकबाल बागवान (वय-40) रा. जोशी पेठ, जळगाव हे भाजीपाला घेण्यासाठी शनिवार 18 रोजी सकाळी 9.50 वाजेच्या सुमारास शहरातील भवानी माता मंदीरामागे असलेल्या भाजीपाला मार्केट मध्ये भाजी घेण्यासाठी आले. 10 दिवसांपुर्वीच त्यांनी ओप्पो कंपनीचा मोबाईल घेतला होता. बाजारात येतांना त्यांनी मोबाईल देखील सोबत आणला. दरम्यांना बाजारात आल्यानंतर भाजी खरेदी करतांना अचानक एक अज्ञात चोरटा हातात न्युज पेपर घेवून आला. नईम बागवान भाजीपाला विक्रेत्याशी बोलत असतांना क्षणात नईम यांच्या वरच्या खिश्यात ठेवलेला मोबाईल चोरट्याने अलगदपणे काढला आणि तेथून पटकन फरार झाला. हे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

शनीपेठ पोलीसात मोबाईल चोरीची तक्रार
नईम इकबाल याचा 9 हजार रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हरविल्याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस कर्मचारी तपास करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound