Home क्राईम बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या भावाची दुचाकी लांबविली

बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या भावाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानक येथे मावस बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या भावाची अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्याची घटना शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.२० वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, इंद्रप्रस्थ नगरातील संजीव प्रल्हाद कलाल हे शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता रेल्वे स्थानकावर मावस बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच.१९.सीबी.१२७८) आले होते. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी उभी केली होती. त्यानंतर सकाळी ८.२० वाजता बहिणीला सोडून ते दुचाकी उभी केल्या ठिकाणी आल्यावर त्यांना दुचाकी दिसून आली नाही. अखेर ती चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound