जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आगामी गणेशोत्सव सण आनंदाने व शांततेत साजरा व्हावा, या उद्देशाने शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, सर्व धर्माचे प्रमुख पदाधिकारी यांना पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गणेश मंडळात सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी मुस्लिम समाजिक कार्यकर्त्यांना सुध्दा आपल्या मंडळात समावेश केल्यास त्याचा साकारात्मक परिणाम होईल असे सांगितले.
शांतता कमिटीच्या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, फारुक शेख, धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी, सुन्नी जामा मशीदचे ट्रस्ट अयाज अली, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद शेख, नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, काकर बिरादरीचे जिल्हाध्यक्ष रियाज काकर, सुप्रीम कॉलनी मशिदीचे प्रमुख सय्यद वाहेद, नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक सदाशिव सोनवणे, एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील व गणेश मंडळाचे प्रमुख प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक फौजदार विश्वास बोरसे यांनी मानले.