सावदा येथे श्री संतसेना महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

सावदा  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे संत शिरोमणि श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त  सावदा नाभिक समाज सेवा प्रतिष्ठान याच्यातर्फे अभिवादन करण्यात आले.

 

आज मंगळवार दि. २३ ऑगस्ट रोजी संत शिरोमणि श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंडळाचे अध्यक्ष व् उपाध्यक्ष यांच्या हस्ते सेनामहाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.  यानंतर समाजातील जेष्ठ सदस्यांचा व  कार्यकारणीमध्ये  नवीन सदस्य समाविष्ट करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमसाठी सावदा शहरातील सर्व नाभिक बंधू भगिनी मोठ्या सख्येने उपस्थित होते. याप्रसंगी  संतसेना महाराज यांचे मंदिर सावदा येथे  उभारण्याचा संकल्प यावेळेस घेण्यात आला.  सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले.  यशस्वीतेसाठी सावदा नाभिक समाज सेवा प्रतिष्ठान कार्यकारी मंडळ सतिष महाजन, युवराज सापकर, युवराज इंगळे, किरण येवले, महेंद्र सापकर, महेश सापकर, प्रकाश सापकर, प्रकाश चांदवे, मिलिंद सापकर  तसेच मंडळाचे नवीन सदस्य सुरेश ठाकरे रामचंद्र ठाकरे रविन्द्र सापकर व  सावदा शहरातील सर्व नाभिक समाज बांधव यांनी  कामकाज पाहिले.   गणेश सापकर यांनी आभार मानले.

 

Protected Content