जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येथील तब्बल पाच कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून याचा भूमिपुजन उद्या सायंकाळी ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यात नशिराबादचे दैवत असणार्या संत श्री झिपरूअण्णा महाराज समाधी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन खात्यातून तब्बल २ कोटी १३ लक्ष रूपयांच्या निधीतून कामांना प्रारंभ होणार आहे. तर शहराच्या विविध भागांमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, गटारी, ढापे, स्मशानभूमी आणि कब्रस्तानला सुरक्षा भिंती, जिम्नॅशीयम आदी कामांचा समावेश आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने नशिराबाद येथे अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. यातील सुमारे ५ कोटी रूपयांच्या कामांचे भूमीपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्या सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यात प्रामुख्याने झिपरूअण्णा महाराज समाधी मंदिर परिसरात पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून करण्यात येणार्या तब्बल २ कोटी १३ लक्ष रूपयांच्या कामाचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. यासोबत अन्य कामांचे भूमीपुजन देखील याच कार्यक्रमात करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सभापती लालचंद पाटील, नगरसेवक ललीत कोल्हे, माजी जि.प. सभापती राजूभाऊ चव्हाण, जना आप्पा कोळी, नरेंद्र सोनवणे, रमेश आप्पा पाटील, माजी सरपंच विकास पाटील, विकासो संचालक विकास धनगर, चंद्रकांत भोळे आणि छत्रपती प्रतिष्ठानचे चेतन बर्हाटे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संत श्री झिपरू महाराज समाधी परिसरात करण्यात आले आहे.
याप्रसंगी संत श्री झिपरू महाराज समाधी मंदिर विकासाससह अन्य कामांचे भूमिपुजन होणार आहे. यात अनुसुचित जाती आणि नवबौध्द घटकांची वस्ती योजना, डीपीडीसी अंतर्गत दलीतेत्तर वस्ती सुधार योजना, अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम योजना, डीपीडिसीमधून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना, दलीत्तेतर वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.