विजवाहक तारा बदलून भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहर व जुनी कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई मंदीर परिसरात विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी केली.  

गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध भागातील तसेच जुनी कोथळी येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई मंदिर व परिसरात संभाव्य अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या हाय हॉल्टेज विद्युत वाहक तारा, जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा, खराब झालेले इलेक्ट्रिक पोल , अतिभारित रोहित्र ठिकाणीं वाढीव नवीन रोहित्रांची वारंवार मागणी तसेच सर्व विद्युत वाहक तारा बदलून त्या ठिकाणी एरियल बंच केबल टाकून विद्युत वहन भूमिगत व्हावे. यासंदर्भात सूचना केल्या होत्या.

त्यानुसार आज शनिवार, दि.२० ऑगस्ट रोजी जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. शेख, कार्यकारी अभियंता श्री. गुप्ता, उप कार्यकारी अभियंता श्री ढोले आदी अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर येथे पाहणी केली. व या संदर्भात सर्वेक्षण व कृती आराखडा तयार करून शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेसाठी एक एजंसी नियुक्त केली जाणार आहे. अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

Protected Content