Home Cities जामनेर विशेषसागरजी महाराजांच्या ४७ व्या अवतरण दिनानिमित्त शहरात फळे व मिष्टान्न वाटप

विशेषसागरजी महाराजांच्या ४७ व्या अवतरण दिनानिमित्त शहरात फळे व मिष्टान्न वाटप

0
45

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथे प. पू. १०८ श्री. विशेष सागरजी महाराज यांचा अवतरण दिवस आहे. या अवतरण दिनाच्या पूर्व दिवशी जामनेर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

याप्रसंगी ४० ते ५० रुग्णांना फळांचा लाभ मिळाला. तसेच जि. प. प्राथमिक शाळा, शहापूर कॉर्नर येथे मिष्टान्न वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मिष्टान्नाचा आस्वाद घेतला. विकास हर्षिता जैन पू. मुनीश्री यांचे गृहस्थ श्रमाचे बंधू सौ. निशा विरेंद्रजी जैन पू. मुनीश्री यांची गृहस्थ बहीण सहपरिवार उपस्थित होते.

तालुका रूग्णालयात फळे वाटपासाठी जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे, जामनेर सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. आर. के. पाटील, भरत सैतवाल, प्रशांत सैतवाल, संजीव सैतवाल, विजय सैतवाल, देवेंद्र खोबरे, अनंत आरतकर, राजु डिकेकर, योगेश आरतकर, अनिल सैतवाल, मोहन जैन, राजु चतुर, रविंद्र मिटकर, किरण खोबरे, सागर जैन, बाळु सुर्यवंशी, दिनेश सैतवाल दिपक कस्तुरे, चंद्रकांत संघवी पारसनाथ देवस्थानचे विशेष सागर युवामंच, महिला मंडल जामनेरट्रस्टी पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound