पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्पर्धेच्या युगात परिश्रमानेच यशाची हमी मिळते. थांबला तो संपला त्यासाठी नेहमी परिश्रम घ्याल तर यश हमखास मिळेल, असे प्रतिपादन अमळनेर येथील आशु नोव्हेल्टीजचे संचालक विशाल शर्मा यांनी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रसंगी केले.
अनाथ मुलांची घेतली शैक्षणिक जबाबदारी
शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्याने विध्यार्थ्याना बक्षीस वाटप करण्यात आले. याप्रसंगी आशु नोव्हेल्टीजचे संचालक विशाल शर्मा यांनी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वही, पेन, पट्टी, वॉटर बॅग, ड्रॉईंग वही, कलर साहीत्य आदी शालेय साहीत्य स्वखर्चाने गुणवंत विध्यार्थ्यांना वाटप केले. तर निराधार असलेल्या दोन विध्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे पालकत्व त्यांनी यावेळी स्वीकारले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदल जाधव होते. तर संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव रोहिदास जाधव,संतोष जाधव, अभेराम जाधव, एकनाथ जाधव, गजमल जाधव, आत्माराम जाधव, मधुकर जाधव, जगन जाधव,मनोज जाधव,पोलीस पाटील, विलास जाधव, केळकर जाधव, अशोक जाधव, किशोर जाधव प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी. के. पोतदार, जेष्ठ शिक्षक एस जे भामरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार प्रा. विजय बेहरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.