यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे गावात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरी समस्या निर्माण झाले आहे. वांरवार तक्रारी देवूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. दरम्यान प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, “यावल तालुक्यातील चुंचाळे येथे ग्रामस्थांच्या घरासमोर उकिरडे व महिलांच्या शौचालयाचे आउटलेट नसणे, पाणीपुरवठा पाईपलाईन मध्ये लिकेज असणे, गावातील गटारीसाठी सफाई कामगार नसणे, पुरुषांसाठी शौचालय व्हावे, अशा विविध प्रश्नांसाठी चुंचाळे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी निवेदने देण्यात आली होती. या निवेदनाकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असल्याने अखेर १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी तक्रारदार मुबारक तडवी यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा बडगा उगारला होता.
यावर सरपंच सुनंदा पाटील व ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांनी सर्व मागण्यांवर योग्य ती कारवाई करत गावातील स्वच्छता करण्यात आली. गावात एक पाणीपुरवठा कर्मचारी व एक ग्रामपंचायत शिपाई हे दोनच कायमचे कर्मचारी आहे. गावात सफाई कामगार कायम नसल्याने सफाईसाठी अडचणी होत होत्या. वेळोवेळी गटारींची सफाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्ते तडवी यांनी उपोषण स्थगित करण्याचे मान्य केले.”
वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी ?
स्वातंत्र्य दिन असल्याने सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ग्रामसेवक यांनी पोलिसांना पाचारण केले होते. याप्रसंगी प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात माहिती घेण्यासाठी पत्रकार गेले. बातमीसाठी पोलीस चमूचे नावे विचारले असता सहाय्यक फौजदाराने पत्रकारांशी उध्दटपणे वागणूक दिली व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या या वागणुकीचा तालुका पत्रकार यांच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. सदर बाब पोलीस निरीक्षक यांची भेट घेत त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता गैरसमजुतीतून प्रकार घडला असावा, असे त्यांनी सांगितले.