जळगावात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने सायकल रॅली

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने आज मंगळावर दि. १६ ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

महापालिकेच्या वतीने महापालिका ते काव्यरत्नावली चौकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांनी  हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला सुरुवात केली.  या रॅलीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड , अधिकारी मनपा कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, रनर ग्रुपचे सदस्य असे साडेतीनशेपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी शहर अभियंता एम.जी. गिरगावकर,  चंद्रकांत वानखेडे , सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर , प्रभाग क्र. २चे  प्रभाग अधिकारी उदय पाटील, प्रभाग क्र. १ चे नरेंद्र चौधरी, प्रभाग क्र. ३चे बाळासाहेब चव्हाण, प्रभाग क्र. ४ चे चंद्रकांत वांद्रे,  क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे आदी कर्मचारी उपस्थित होते. महापालिका, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक मार्गे काव्यरत्नावली चौक व पुन्हा महापालिकेजवळ रॅलीचा समारोप झाला. सायकल रॅली ही व्यावसायिक नसल्याने सर्वांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपला देखील सहभाग असावा या उद्देशाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रॅलीत खेळीमेळीच्या व खेळाडू वृत्तीने सायकल रॅली निर्धारित वेळेत पूर्ण केली गेली. प्रथमोपचारासाठी शाहू महाराज मनपा हॉस्पिटलची रुग्णवाहिका देखील यावेळी तैनात करण्यात आली होती. रॅलीमध्ये भाग घेणाऱ्या नागरिकांना, मनपा अधिकारी, कर्मचारी, विभाग प्रमुख यांना मनपातर्फे पांढरे टी-शर्ट देण्यात आले होते. रॅली दरम्यान “भारत माता की जय “,  “वंदे मातरम”, “भारतीय संविधानाचा विजय. असो ” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.  सायकल रॅलीमध्ये सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्रके देऊन मनपा आयुक्त डॉ विद्या गायकवाड तसेच अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्यातर्फे गौरवण्यात आले.

 

Protected Content