गोदावरी फाऊंडेशनच्या शैक्षणिक संकुलात ध्वजारोहण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशनच्या मेडिकल कॉलेज, नर्सिंग, होमिओपॅथी, फिजीओथेरपी,आयुर्वेद महाविद्यालयाच्यावतीने स्वातंत्र्य दिन  उत्सहात साजरा करण्यात आला.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी, गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील कृषी तसेच कृषी अभियांत्रिकी आणि कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्यावतीने संयुक्त विद्यमाने सोमवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अ‍ॅकेडमीक डिन डॉ. नेहा वझे-महाजन, अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह डीन डॉ.जयंत देशमुख, मेडिकल सुपरिटेंडेट डॉ.चंद्रेय्या कांते, पेडियाट्रिशन  डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. माया आर्विकर, फिजीओथेरपी प्राचार्या डॉ. जयवंत नागुलकर, होमिओपॅथीचे प्राचार्या डॉ. डी. बी. पाटील, गोदावरी नर्सिंगचे डायरेक्टर शिवानंद बिरादर,  प्रा. विशाखा वाघ,  वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बापूराव बिटे, डॉ. विठ्ठल शिंदे, आयुर्वेदचे डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून राष्ट्रगीत झाले. भारत माता की जयचा नारा यावेळी देण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रथमेश गवाळे, बुशरा खान यांनी भाषणे दिली. याप्रसंगी डीन डॉ.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी शुभेच्छा देऊन उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शनपर केले. याप्रसंगी परिसरातील सर्वच महाविद्यालयातील टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफची यावेळी उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नझीफ, अ‍ॅलेक्स पोल यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून एकतेचा संदेश 

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ फार संघर्षमय होता, मात्र अनेक क्रांतीकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आज भारत देश विविधतेने नटलेला असून येथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने नांदत आहे, हे दाखवून देणारी नाटिका गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. यासह देशभक्तीपर गीतगायन आणि नृत्याद्वारेही एकतेचा संदेश देण्यात आला. यात तेरी मिट्टी मे गीत वृंदा सोनवणे हिने गायले तर डी मेजर बॅण्ड डीयूपीएमसीएचमध्ये विशाल व साई सुथार, अभिषेक पाटील यांचा समावेश होता.

अस्तित्वाची लढाई कायम – डॉ.  जयंत देशमुख 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा देत अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह डिन डॉ.जयंत देशमुख यांनी त्याचे महत्व विशद केले. दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असून यात वर्षभरात आपण काय चांगले केले किंवा काय आपल्या हातून चुकीचे घडले, याची आठवण, स्मरण या दिवशी करावे, सीमेवर लढणार्या आपल्या सैनिकांना तर सॅल्युट करायलाच हवा मात्र आपल्या कृतीतूनही देशासाठी अनेक चांगल्या गोष्टी करु शकतो, कारण अस्तित्वाची लढाई कायम आहे आणि आज ध्वजारोहण सोहळ्यासाठी भर पावसात न डगमगता उभे आहात, याबद्दल विद्यार्थ्यांचेही कौतुक डॉ. देशमुख यांनी केले.

Protected Content