यावल-अय्युब पटेल । स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्ताने काँग्रेसच्या वतीने ९ ऑगस्टपासुन संपुर्ण तालुक्यात आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेचे १५ ऑगस्ट रोजी समारोप करण्यात आला.
यावल तालुका सहकारी शेतकी संघाच्या आवारातून या पदयात्रेच्या समारोपाची सुरवात करण्यात आली. ही पदयात्रा बुरुजचौकमार्गे संपूर्ण यावल शहरातील प्रमुख मार्गाने भव्यदिव्य पदयात्रा काढून देशभक्तीपर गीत, ढोलताश्यांच्या गजरात गौरव पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पंचशील नगर, आठवडे बाजार, परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार शिरीष चौधरी यांनी पदयात्रेचे नेतृत्व केले. यावेळी माजी आ. रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जेष्ठनेते हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, जि.प.माजी सदस्य आर.जी.नाना पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, शहराध्यक्ष कदिर खान, फैजपूरचे नगरसेवक केतन किरंगे, कलिम मण्यार, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, युवक विधान सभा क्षेत्र अध्यक्ष फैझल शाह, माजी नगरसेवक जाकीर, मनोहर सोनवणे, समीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कॉंग्रेसचे कार्यकर्ते पुंडलिक बारी,विवेक सोनार, मुक्तार पटेल,प्रदेश मीडिया सरचिटणीस उमेश जावळे, विक्की गजरे, नईम शेख, रहेमान खाटीक, अझहर शेख, सतीशआबा पाटील,कलीम शेख, रशीद मण्यार, करीम कच्ची, अशपाक शाह, सकलेन शेख,अमर कोळी, विक्की सोनवणे, राहुल सोनवणे यांच्यासह यावल तालुका व शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते सरपंच, विविध संस्थेचे चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरव यात्रेला तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातुन नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.