गेंदालाल मिल परिसरात कॉंग्रेस सेवा दलातर्फे ध्वजारोहण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील गेंदालाल मिल मधील श्री दुर्गा माता मंदिराजवळ भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवी दिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी कॉंग्रेस सेवा दलातर्फे ध्वजारोहण करण्यात आले.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवी दिनी  गेंदालाल मिल मधील श्री दुर्गा माता मंदिराजवळ ध्वजारोहण व मतदान  जनजागृती कार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रम आयोजक काँग्रेस सेवा दलाचे गोकुळ चव्हाणयांनी केले होते.  ध्वजारोहण माजी सैनिक  मुकेश भालेराव यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एजाज भाई(लाला )खान, शांताराम भारुळे, ज्ञानेश्वर वाघ, अजिज खान, सुभाष माळी, सुशीलाबाई सोनवणे, आशा सोनवणे, सतोष गायकवाड, राहुल वाघ, गोपी गोसावी, नितिन चंदनशिव, निलेश भासले, तेजस हीवराळे, अफजल भाई फिरोज खान आदी नागरिक उपस्थित होते.

Protected Content