Home क्राईम ‘त्या’ महिलेचा मृत्यू ; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

‘त्या’ महिलेचा मृत्यू ; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

chalisgaon muder
chalisgaon muder

chalisgaon muder
 

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघडू येथे चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीच्या डोक्यात तिच्या पतीने कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केले होते. आज उपचारादरम्यान, त्या महिलेचा मृत्यू झाला असून या संदर्भात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, भिकन भाऊराव पवार याने आपली पत्नी अन्नपूर्णा भिकन पवार (वय 50) हिच्या चारित्र्याच्या संशयावरून शनिवारी रात्री डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून गंभीर जखमी केले होते. जखमी विवाहितेवर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. रविवारी रात्री रात्री दीड वाजेच्या सुमरास तिचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. त्यामुळे भिकन पवार याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी भिकन पवार यास आपली पत्नी दुसऱ्या कोणाबरोबर तरी पळून जाणार असल्याचा संशय आल्याने त्याने दिनांक 18 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे करीत आहेत


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound