Home Cities जामनेर जामनेरात माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

जामनेरात माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

0
32

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यातिथीनिमित्त जामनेर भाजपाच्यावतीने प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.

माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यातिथीनिमित्त मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा सुधना महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, अतिश झाल्टे, दत्तू सोनवणे, नाना वाणी, रवींद्र झाल्टे, निलेश चव्हाण, वासुदेव घोंगडे, विजय शिरसाठ, कैलास पालवे, मयूर पाटील, अजय नाईक, नितीन झाल्टे, यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound