Home Cities अमळनेर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त गरजूंना मोफत सायकल वाटप

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त गरजूंना मोफत सायकल वाटप

0
121


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जि.प.उच्च प्राथमिक शाळा जळोद ता. अमळनेर जि.जळगाव येथे हिंगोणेसिम येथून ३ किमी. पायी चालत येणाऱ्या २३ गरीब व गरजू विद्यार्थ्याना ‘सायकल बँक’ उपक्रम अंतर्गत युवकमित्र परिवारातर्फे मोफत सायकल वाटप केले जाणार आहे.

उद्या सोमवार, दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता हे वाटप केले जाणार आहे. सायकल बँक हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून पुणे येथे  नोकरीनिमित्त असलेले युवमित्र परिवारचे संचालक प्रवीण महाजन यांनी हाती घेतला आहे. त्यांचा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound