पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील सराफा व्यापाराच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे पहूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “पहूर कसबे तालुका जामनेर येथील पूनमचंद गुलाबचंद वर्मा (वय 42) यांचे लोहारा तालुका पाचोरा येथे मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान असून ते आज आपले दुकान बंद करून नेहमीप्रमाणे सायंकाळी सात वाजता लोहारा येथून पहुरकडे येत असताना गोगडीच्या पुलाजवळ रक्तबंबळा अवस्थेत मयत स्थितीत आले. यामुळे पहूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मयत पूनमचंद वर्मा यांच्याजवळ असलेली बॅग व मोबाईल हे दोघे गायब असल्याची चर्चा आहे. मात्र सदर व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद असून हा अपघात आहे की काही घातपाताचा प्रकार आहे. अद्याप या गोष्टीचा उलगडा झाला नाही.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सदर घटनेचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.