Home Cities जामनेर जामनेरात मंत्री आ. गिरीश महाजन यांचे जल्लोषात स्वागत (व्हिडीओ)

जामनेरात मंत्री आ. गिरीश महाजन यांचे जल्लोषात स्वागत (व्हिडीओ)

0
107

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जामनेर शहरात दाखल झाल्यानंतर त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

जामनेर मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन यांनी राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईत त्यांचा मुक्काम होता. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी गिरीश महाजन यांनी रेल्वेने जळगावात दाखल झाल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव रेल्वेस्थानकात स्वागत केले. त्यानंतर सकाळी १० वाजता जामनेर शहरात मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. रस्त्यावर ठिकठिकाणी महिलांना त्यांचे औक्षण करून पुष्पहार घालण्यात आला. जामनेर शहरातील नगरपालिका चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/811925076845574


Protected Content

Play sound