एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मातोश्रीला भेट देऊन निष्ठेची शपथपत्रे उध्दव ठाकरे यांना सुपुर्द केलीत.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत आणि जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या उपस्थितीत एरंडोल तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांनी मुंबई येथे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शपथपत्र सादर करून पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली. आमदार चिमणराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी एरंडोल तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी हे मातोश्रीसोबत असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.
याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी जि.प. सदस्य नाना महाजन, दिलीप रोकडे, अनिल महाजन, विवेक पाटील, हिंमत पाटील, कुणाल महाजन, कमलेश पाटील, अतुल महाजन, संजय पाटील, सुरेश पाटील, सुभाष मराठे, रूपेश माळी, नितीन बिर्ला, संजय महाजन, रमेश माळी, रेवानंद ठाकूर, परेश बिर्ला, अमोल भावसार आदींसह अन्य पदाधिकार्यांची उपस्थिती होती.