अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे येथील एक अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील प्रथमेश साहेबराव भदाणे या 16 वर्षीय मुलाला पानथरी नावाचा गंभीर आजार जडला आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसात प्रथमेशचे ऑपरेशन न झाल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ,असे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रथमेशचे आई-वडील हातमजूर असून तो त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.
प्रथमेश सध्या 12 वी ला असून अभ्यासात खूप हुषार आहे. परंतु नियतीने त्याच्यावर आज जीवन-मृत्यूचा प्रसंग आणून ठेवलाय. पुण्यातील डॉक्टरांनी प्रथमेशचे पुढील दोन-तीन दिवसात ऑपरेशन सांगितले आहे. ऑपरेशन लवकर केले नाही. तर मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी कळवले आहे. प्रथमेश आपल्या आई-वडिलांचा आधार आहे. आई-वडील शेतात दिवस रात्र कष्ट करतात त्यांचाकडे ऑपरेशनसाठी पैसा नाहीय. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या इच्छेप्रमाणे आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथमेशला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन समाधान पाटील (नाशिक) यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी तुषार पाटील 7776877862 ,9834462463 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे सांगण्यात आले आहे.